स्कूल चले हम

स्कूल चले हम

SARAL महत्वाचे

पंचायत समिती हवेली,जि.प.पुणे (शिक्षण विभाग) च्या अधिकृत ब्लॉग मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे             दिनांक ०९/०१/२०१७ पासून राज्यातील संपूर्ण जिल्ह्यात सेल्फी सह उपस्थिती नोंद करण्याचे काम सुरु होत आहे.सेल्फी सह उपस्थिती नोंद करताना उपस्थिती या नावाचे Android मोबाईल app आपल्या Mobile वर Install करावे.हे App Download करण्यासाठी वर्गशिक्षकांनी आपल्या शाळेच्या Student पोर्टल ला Login करावे आणि Attendance App या Tab मध्ये असलेल्या Download App या sub-tab ला क्लिक करावे.सोमवारी उपस्थिती आणी सेल्फीसह उपस्थिती अशा दोन्ही प्रकारे उपस्थिती घ्यायची असल्याने सदर App हे आपल्या Mobile मध्ये आपल्या Student पोर्टलमध्ये असलेल्या रजिस्टर mobile नंबर ने रजिस्टर होणे गरजेचे आहे.ही प्रक्रिया सोमवार दिनांक ९ जानेवारी २०१७ रोजी सकाळी शाळा सुरु होण्याच्या आत पूर्ण होणे गरजेचे आहे.उपस्थिती या नावाचे Android मोबाईल app आपल्या शाळेच्या student पोर्टल मधून Download करण्याची सुविधा ही दिनांक ०७/०१/२०१७ ला सायं. ठीक ७ वाजेपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तरी सर्व शाळांच्या वर्ग शिक्षकांनी हे app आपल्या mobile मध्ये रजिस्टर करून घ्यावे,जेणेकरून सोमवारी आपण उपस्थिती आणि सेलफीसह उपस्थिती नोंद करू शकाल.            student पोर्टल मध्ये पायाभूत चाचणी आणि संकलीत चाचणी १ मध्ये विद्यार्थ्यांनी मिळविलेले गुण भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.सदर माहिती भरून पूर्ण करण्याची अंतिम मुदत ही ०८/०१/२०१७ ही देण्यात आलेली आहे.            विद्यार्थी आधार नंबर नोंद करणे,स्थलांतरीत विद्यार्थी माहिती भरणे यासाठी दिनांक ०८/०१/२०१७ ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.            student पोर्टल मध्ये वर्गशिक्षक नोंद घेणे आणी वर्ग/तुकडी ला वर्गशिक्षक assign करणे यासाठी दिनांक ०३/०१/२०१७ ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.सदर मुदतीत वाढ देण्यात येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.            MDM पोर्टल मध्ये ३१ डिसेंबर २०१६ रोजीचा शिल्लक धान्य व धान्यादी माल नोंद करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून दिनांक ०१/०१/२०१७ ते ०८/०१/२०१७ ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे.यानंतर कोणत्याही शाळेस मुदत वाढ देण्यात येणार नाही याची सर्व शालेय पोषण आहार लाभार्थी शाळांनी नोंद घ्यावी.

बडबड गीते

1) आपडी थापडी

आपडी थापडी
गुळाची पापडी
धम्मक लाडू, तेल काढू!

तेलंगीचे एकच पान
दोन हाती धरले कान!


चाउ माउ, चाउ माउ!
पितळीतले पाणी पिउ!
हंडा पाणी गडप!2)गाडी कशी धावते

गाडी कशी धावते
भप भप भप
पाउस कसा पड़तो
रप रप रप
घोडा कसा धावतो
टप टप टप
बाबा कसे मारतात
धप धप धप
आई कशी महणते
गप गप गप
खाउ देते बाळाला
खुप खुप खुप 


- म पा भावे


3) नाच रे मोरा

नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच


ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच, नाच रे मोरा ...


झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहीतरी गाऊ
करुन पुकारा नाच, नाच रे मोरा ...


थेंब थेंब तळयात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघात, खेळ खेळू दोघांत
निळया सवंगडया नाच, नाच रे मोरा ...


पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच, नाच रे मोरा ...

4) आजी बाई

आजी बाई आजी बाई 
कुठे निघाला?
जाणार कुठे मी
जाते देवाला!

आजी बाई आजी बाई
बेल कशाला?
आज आहे सोमवार
महादेवाला!

आजी बाई आजी बाई
दुर्वा कशाला?
आज आहे मंगळवार
गणपतीला!

आजी बाई आजी बाई
हार कशाला?
आज आहे गुरुवार
दत्तगुरूला!

आजी बाई आजी बाई
तांदूळ कशाला?
आज आहे शुक्रवार
अंबाबाईला!

आजी बाई आजी बाई
तेल कशाला?
आज आहे शनिवार
मारूतीला!

5) ये रे ये रे पाउसा 
ये रे ये रे पाउसा 
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाउस आला मोठा
ये ग ये ग सरी
माझे मडके भरी
सर आली धाउमडके गेले वाहून 


1 comment:

  1. sanstha samayojan mahiti kashi Bharayachi Yababat margdarshan karave.

    ReplyDelete

Note: Only a member of this blog may post a comment.